पेण, खालापुरात केल्या चोर्या
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेण आणि खालापूर तालुक्यात मोटारसायकल चोरणार्या बंटी-बबलीला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. दोन लाख तेरा हजार किमतीच्या आठ मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. पोलीस हवालदार राकेश म्हात्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
विक्रम राम कालेकर (36), रा. यशवंत नगर, खराडी, पुणे, मूळ रा. लाडवली, ता. पनवेल, जि. रायगड आणि अनुराधा विवेक दंडवते (31), रा. यशवंतनगर, खराडी, पुणे, मूळ रा. 75/4, पर्वती पायथा, स्वारगेट, पुणे अशी आरोपींची नावे आहेत.रसायनी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. त्याचा तपास करताना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या बंटी बबलीचा पोलिसांनी शोध घेतला. आरोपी हा पुणे येथे राहत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याचे बाबत विचारपूस केली असता त्याने त्याची महिला साथीदार हिच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिकच्या चौकशीमध्ये सदर आरोपीने 10 मोटर सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. पेण तालुक्यात तीन रसायनी तालुक्यात पाच आणि नवी मुंबई मध्ये दोन गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कदम, एएाआय कोरम, पोह/मोरे, पोहा/झेमसे, पोह/राजा पाटील, पोह/सावंत, पोह/म्हात्रे, मपोशि चव्हाण तसेच सायबर विभागाचे पोना/तुषार घरात व पोना/अक्षय पाटील यांनी केली आहे.