398 धावांचे आव्हान; कोहली-श्रेयसची शतके
| मुंबई | प्रतिनिधी |
विराट कोहलीचे महाशतक आणि श्रेयस अय्यसच्या शतकांच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीच्या विजयाचा भक्कम पाया रचला आहे. कोहलीने यावेळी आपेल 50 वे शतक साजरे करत सचिन तेंडुलकरचा जागतिक विक्रम मोडीत काढला. कोहली बाद झाल्यावर श्रेयसने आपले शतक साजरे केले. त्यामुळेच भारताने या सामन्यात धावांचा डोंगर रचला आणि त्यामुळे त्यांनी विजयाचा पाया रचल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
कोहलीने यावेळी 113 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 117 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. श्रेयसने यावेळी 70 चेंडूंत 105 धावांची धमाकेदार शतकी खेळी साकारली. भारताने यावेळी 397 धावा करत विजयाचा पाया रचला.शुभमन गिलने 66 चेंडूत 80 तर कर्णधार रोहित शर्माने 29 चेंडूत 47 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 2 बळी घेतले.
रोहित नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला आला आणि त्याने एकामागून एक फटक्यांची अतिषबाजी केली. रोहीतने यावेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासून कडक प्रहार करायला सुरुवात केली. घरच्या मैदानावर फक्त 29 चेंडूत 47 धावा केल्या. मात्र स्पर्धेतील चौथे अर्धशतक त्याला पूर्ण करता आले नाहीत. मीड ऑफच्या दिशेने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात टिम साउदीच्या चेंडूवर तो बाद झाला. रोहितने या खेळीत 4 चौकार आणि चार षटकार मारले. घरच्या मैदानावर फक्त 29 चेंडूत 47 धावा केल्या. मात्र स्पर्धेतील चौथे अर्धशतक त्याला पूर्ण करता आले नाहीत.
इतकेच नाही तर रोहितने एका विश्वचषकामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा गेलचा विक्रम मोडला. गेलने 2015च्या विश्वचषकामध्ये 26 षटकार मारले होते. आता रोहितच्या नावावर 27 षटकार झाले आहेत. 23व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शुभमन दुखापग्रस्तझाला ला. त्याच्या जागी श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. गिलच्या मदतीला फिजिओ मैदानात आले होते. मात्र फिजिओसोबत चर्चा करून गिलने मैदान सोडले. गिलने 65 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 79 धावा केल्या. गिल मैदानाबाहेर गेल्यावर फलंदाजीला आलेल्या श्रेयसने यावेळी शतक झळकावले. त्यामुळेच भारताला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली.
पॉवरप्लेमध्ये भारताची सुरुवात वेगवान झाली. संघाने पहिल्या 10 षटकांत 8.4 धावगतीने फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्याच षटकात 10 धावा देत न्यूझीलंडवर दडपण आणले. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथीचा छोटा स्पेल 5 षटके टिकला. आक्रमक फलंदाजी पाहून कर्णधार विल्यमसनने सहाव्या षटकात फिरकीपटू मिचेल सँटनरला संघात आणले, सँटनरने 11 धावांचे षटक दिले. ट्रेंट बोल्टने रोहितला शॉर्ट लेन्थ बॉल ओढण्याचा मोह केला, पण रोहितने त्याचे रूपांतर बाऊंड्रीमध्ये केले. नवव्या षटकात टीम साऊदीसमोर मोठा फटका खेळून रोहित शर्मा बाद झाला . त्याने 29 चेंडूत 47 धावांची खेळी खेळली आणि गिलसोबत 71 धावांची भागीदारी केली. पॉवरप्लेमध्ये भारताने धावफलकामध्ये 84 धावांची भर घातली.