ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची उद्या शोकसभा

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, 11 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम करणारे गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भाई शंकरराव मोरे पुतळा, जंगली महाराज रोड पुणे येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी गणपतराव देशमुख, शंकरराव मोरे, थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करण्यात येणार आहे. शेकापचे प्रदेश कोषाध्यक्ष तथा जिल्हा चिटणीस राहुल पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 12 वाजता बीड जिल्ह्यातील केज येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

Exit mobile version