| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड मधील भूमी अभिलेख कार्यालय जीर्णावस्थेत असून त्याची पार दुरावस्था झाली असल्याने सदर कार्यालय तातडीने पर्यायी जागेत हलविण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील उपअधिक्षक भूमिअभिलेख मुरुड याचे कार्यालय हे आज रोजी ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारती ही अतिशय जुनी असून सदर इमारतीमध्ये ठेवण्यात आलेल्या मुरुड तालुक्याचे सर्व दफ्तर (रेकॉर्ड) हे पावसाचे पाण्याचे अतिशय खराब झाले आहेत. त्यामुळे सदर कार्यालयातील रेकॉर्ड उपलब्ध होण्याकरीता मुरुड तालुक्यातील सर्व जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सदर इमारत ही वापरणे योग्य नसल्यामुळे तहसिलदार मुरुड पर्यायी जागा उपलब्ध करुन देणेबाबत पत्र व्यवहार करणेत आला आहे. मात्र आज पर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारचा विचार विनिमय झालेला नाही. मुरुड तालुक्यातील सर्व जमिनीचे रेकॉर्ड हे उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयांत जतन करुन ठेवले गेले आहेत, परंतु सदर इमारतीची दुर्दशा झाली असल्यामुळे सर्व रेकॉर्ड जतन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. सद्याचे युग जरी संगणकीकृत असले तरी मुरुड मध्ये नेट कनेक्टीव्हीटीचा त्रास होत आहे. तरी मुरुड तालुक्यातील उपअधिक्षक भूमि अभिलेख मुरुड यांचे कार्यालयाकरीता पर्यायी जागा म्हणून, तहसिलदार मुरुड यांचकडील प्रस्तावामध्ये नमूद केलेली गटविकास अधिकारी मुरुड यांचे निवासस्थानचे जागेमध्ये हलविणेबाबत व सदर निवासस्थानाचे ठिकाणी उपअधिक्षक भूमिअभिलेख यांचे कार्यालयाचे नविन बांधकाम करणेंस परवानगी देणेबाबत, आपल्या कडून शिफारस करणेत यावी.असे मंगेश दांडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.