नौशाद दळवींच्या नेतृत्वात आंदोलन

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

बदलापुर येथील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भर पावसात मुरुड शहरात निषेध आंदोलन करण्यात आले. येथील मधलीआळीपासुन ते मुख्य बाजारपेठेपर्यंत नौशाद दळवी यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला व हाताला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला. यावेळी बाजारपेठेत कार्यकर्त्यांनी बदलापूर घटनेचा निषेध, आरोपीला त्वरित फाशी झाली पाहिजे, भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात नौशाद दळवी यांच्यासह कुणाल सतविडकर, आदेश दांडेकर, प्रमोद भायदे, राजा सोंडेवर, वासंती उमरोटकर, रूपेश जामकर, दिपाली जामकर, राहील कडु, आफीज कबले, इस्माईल शेख, राजेश मुळेकर, बाळकृष्ण गोंजी, सेजल घुमकर, अमित गोंजी, इस्माईल घलटे आदिंसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version