| सुधागड -पाली | वार्ताहर |
मराठा आरक्षण आंदोलनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून पाली पोलीस स्टेशन समोरील मैदानात बुधवारी (दि.20) पाली पोलीस स्थानकातील अधिकारी, अंमलदार तसेच आरसीपी प्लाटून माणगाव यांच्याकडील 30 अंमलदार यांच्या उपस्थितीत संयुक्त सराव घेण्यात आला. या संचलनाकरीता पाली पोलीस स्टेशनमधील तीन अधिकारी व 10 अंमलदार हजर होते. तसेच संचलन झाल्यानंतर पाली शहरातून उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार यांनी रूट मार्च केला. रूट मार्च दरम्यान महत्त्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या. पालीसह सुधागड तालुक्यात शांतता राखावी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात यावे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.