देवळे माध्यमिक शाळेत फिरते संग्रहालय

| पोलादपूर | वार्ताहर |

नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय, देवळे या पोलादपूर तालुक्यातील माध्यमिक शाळेत फिरते संग्रहालय उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन शस्त्र आणि नाणी प्रदर्शन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भरविण्यात आले.

यावेळी देवळेच्या विद्यार्थ्यांनी कटयार, भला, विटा, बिचवा, फरशी, वाघनखे, धोप तलवार, वक्रपात तलवार, दांड पट्टा आदी शस्त्रं कुतुहलाने हाताळली आणि चाळीस देशांतील नाणी आणि नोटा यांचे प्रदर्शन तसेच शिवकालीन युध्द कलेचे प्रात्यक्षिक देखील आयोजित करण्यात आले.

जिल्ह्यातील अतिदुर्गम ग्रामीण तालुक्यात सातत्याने मागील सात वर्षांपासून धैर्य सामाजिक संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्यापैकीच एक फिरते संग्रहालय हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आकर्षण बनला आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणखी भर पडावी यासाठी संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. इतिहास, अर्थ शास्त्र, स्वसंरक्षण या तीन महत्वाच्या बाबी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून आणि प्रदर्शन भरवून शिकविल्या जात आहेत. या उपक्रमासाठी धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर, तृप्ती उतेकर, आर.एल.पिंगळा, जी. ए. गोळे, शुभांगी उतेकर, के. बी. दाभेकर, एन. के.शिंदे उपस्थित होते.

Exit mobile version