खा. गोडसेंचा पत्ता कट?

नाशिक, धाराशिवमध्ये राष्ट्रवादीकडे जाणार

| धाराशिव | वृत्तसंस्था |

नाशिक आणि धाराशिवच्या जागेबाबत महायुतीतील तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याची माहिती आहे. यासोबतच धाराशिव अर्थात उस्मानाबाद लोकसभाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, तर धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धाराशिवमधून ठाकरे गटातर्फे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर नाशिकमधून ठाकरेंनी राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिलं आहे.

धाराशिववर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केल्यामुळे मोठा तिढा निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत या मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरु होतीच, पण भाजपही या जागेसाठी उत्सुक होतं. भाजपकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा होती. परंतु परदेशींना ‘घड्याळ’ चिन्हावर लढण्याची अट घालण्यात आली होती. मात्र ते ‘कमळ’ चिन्हासाठीच आग्रही असल्याने काळेंना संधी दिल्याचं बोललं जात आहे.

Exit mobile version