| नाशिक | वृत्तसंस्था |
नाशिकच्या मनमाडमध्ये 19 वर्षीय तरुणाने साडेतीन वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या मनमाडमध्ये भाडोत्री राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाने घरमालकाच्या साडेतीन वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पिडीत मुलाच्या वडिलांनी या घटनेबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. अत्याचार करणाऱ्या संशयित हर्षल भालेराव या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.