तरुणावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील साळोख येथील आदिवासी वाडी मधील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून शरीर संबंध प्रस्तापित करणाऱ्या तरुणावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आदिवासी मुलगी गरोदर असून नेरळ पोलीस त्या तरुणाला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे.
साळोख आदिवासी वाडी मधील अल्पवयीन 14 वर्षीय मुलगी एक ऑक्टोबर पासून घरखर्च मिळावा या हेतूने काम शोधण्यासाठी घराबाहेर पडली. ती अल्पवयीन मुलगी असल्याचे माहिती असून देखील तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तालुक्यातील नांगडाव जवळील चेवणे येथील नवनाथ रघुनाथ चवर(21) या तरुणाने त्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर सातत्याने शरीर संबंध ठेवले. त्यामुळे ती 14 वर्षे वयाची तरुणी गर्भवती राहिली आहे. त्यामुळे त्या तरुणीच्या पालकांनी हि बाबा कळंब येथे असलेल्या नेरळ पोलीस ठाणे यांच्या आउट पोस्टमध्ये जाऊन पोलीस दहिकाऱ्यांच्या कानी घातली. त्यानंतर पोलिसांनी नवनाथ रघुनाथ चवर या तरुणावर नेरळ पोलीस ठाणे येथे आला असून अधिक तपास महिला पोलीस उप निरीक्षक प्राची पांगे करीत आहेत.