। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
भागीदारीत घेतलेला फ्लॅट परस्पर विक्री करून आलेली रक्कम स्वतःच्या खात्यात घेऊन 33 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी प्रदीप पाटील रा.खडक, उमरगा, लातूर याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 25) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार संजय परदेशी हे करंजाडे येथे राहत असून, त्यांनी आणि प्रदीप पाटील यांनी इमारत भागीदारीमध्ये विकसित करण्यासाठी घेतली होती. 2023 ते 2026 पर्यंत त्यांनी भागीदारीमध्ये विकसित करण्यासाठी घेतलेल्या साई दर्शन बिल्डिंग करंजाडे या इमारतीतील फ्लॅट संजय परदेशी यांच्या परस्पर विकून आलेले 33 लाख रुपये ही भागीदार फर्मच्या नावे असलेल्या खात्यात न घेता स्वतःच्या खात्यात घेऊन संजय परदेशी यांची फसवणूक केली.






