खा. नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ; वडिलांना फरार घोषीत करण्याची कारवाई सुरूच

। मुंबई । वृत्तसंस्था ।

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे आहेत. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा यांचे वडिल हरभजन सिंह हे देखील सहआरोपी आहेत.

नवनीत राणा अधिवेशनात असल्याने कोर्टासमोर हजर राहू शकल्या नाहीत पण त्यांचे वडील कुठेही व्यस्त नसताना कोर्टासमोर का हजर राहिले नाहीत, यासाठी त्यांच्याविरोधात समन्स बजावण्यात आला. तरी देखील ते कोर्टासमोर हजर राहिले नाही. तेव्हा त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं. तरी देखील ते कोर्टासमोर हजर झाले नाहीत. यानंतर त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

या आदेशाला नवनीत राणा यांच्याकडून मुंबई सत्र न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांची ही याचीका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शिवडी महानगर दंडाधीकारी कोर्टाने आपले आदेश कायम राखत हरभजन सिंह यांना फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Exit mobile version