खासदार सुप्रिया सुळेंनी घेतले सोमजाईचे दर्शन

मातेची खणा-नारळाने भरली ओटी

। रायगड । खास प्रतिनिधी ।

बारामती लोकसभेच्या निडणूकीत नणंद विरुध्द भावजय असा सामना रंगला होता. देश पातळीवर हि निवडणूक लक्षवेधी ठरली होती. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचापराभव केला आहे. चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सोमजाई मातेचे गुरुवारी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सोमजाई मातेची खणा-नारळाने ओटी भरली.

सकाळी 9 वाजता खासदार सुप्रिया सुळे यांचे हेलिकॉप्टर रवींद्र राऊत येथील पटांगणात उतरले. श्री सोमजाई मंदिर येथे दर्शन घेतले. त्यानंतर तातडीने त्या हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना झाल्या. दरम्यान, खासदार झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा प्रथमच दौरा होता. खासगी दौरा असल्याचे सांगत पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी ते प्रसारमाध्यमांना देखील दूर ठेवण्यात आले होते.

Exit mobile version