एमपीएससी, बीएड सीईटीची परीक्षा एकाच दिवशी

। मुंबई । प्रतिनिधी ।
एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परीक्षार्थींना सरकारने पर्याय दिला आहे. दोन्ही परीक्षा देणार्‍यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.एमपीएससीची आणि बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्टला आहेत.

यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच तारखेला आल्या आहेत. एका परीक्षेला मुकावं लागणार की काय, अशी भावना आणि संभ्रम परीक्षार्थींच्या मनात होता. पण सरकारने यावर तोडगा काढला आहे. दोन्ही परीक्षा देणार्‍यांना तारखेबाबत पर्याय देणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version