एमपीएससी अभ्यासक्रम 2025 पासून लागू

पुणे | वृत्तसंस्था |

एमपीएससीची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. एमपीएससीने आपला अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाचे आभार मानले आहेत. विद्यार्थ्यांची जी मागणी होती त्या प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्हाला या प्रकरणात राजकीय श्रेय घ्यायचे नव्हते. मात्र काही लोक विद्यार्थ्यांच्या आडून त्याला राजकीय रंग प्रयत्न करत होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Exit mobile version