। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. एकनाथ शिंदे यांनी दोन महत्वपूर्ण घोषणा केल्या, ज्यामध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार आणि रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.