वसुलीसाठी महावितरणची सक्तीची मोहीम

उरणमध्ये पावणे नऊ कोटींची थकबाकी; वसुलीसाठी महावितरणची सक्तीची मोहीमकारवाई टाळण्यासाठी थकीत रकमेच्या भरण्याचे आवाहन
। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील पाच हजार ग्राहकांकडे महावितरणची पावणे नऊ कोटी रुपये थकीत आहेत. थकीत रकमेच्या वसुलीसाठी महावितरणची जोरदार मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांनी दिली.

उरण तालुक्यात वाणिज्य, घरगुती आणि सार्वजनिक असे एकूण 55 हजार ग्राहक आहेत. यापैकी पाच हजार ग्राहकांकडे महावितरणची पावणे नऊ कोटी रुपये थकीत आहेत. यामध्ये घरगुती, वाणिज्य आणि सार्वजनिक ग्राहकांचा समावेश आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर उरण महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात जोरदार थकित बिले वसुलीसाठी सक्तीची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी 40 कर्मचार्‍यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती चोंडे यांनी दिली.

नागरिकांनी वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तत्काळ वीजेच्या बिलांचा भरणा करावा असे आवाहन उरण महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांनी नागरिकांना केले आहे.

Exit mobile version