13 पोलीस ठाण्यांसह सायबर पोलीस ठाण्यात 11 गुन्ह्यांची नोद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट अशा डिजिटल माध्यमांद्वारे सायबर फसवणूक करणाऱ्यांविरोधात रायगड पोलिसांनी कारवाई केली. म्यूल बँक खातेधारकांनी आर्थिक लाभासाठी दुसऱ्याला बँक खाती वापरण्यास दिल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी 35 कोटी रुपयांची सायबर फसवणुकीचे 23 गुन्हे दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 13 आणि सायबर पोलीस ठाण्यांमध्ये 11 गुन्ह्यांची नोंद आहे. सायबर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.
कॅशलेसच्या आर्थिक व्यवहारामुळे ऑनलाईनवर अधिक भर दिला जात आहे. जिल्ह्यामध्ये 70 टक्के ऑनलाईन व्यवहार चालत आहेत. मात्र, जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर फसवणूक करणारे संगमनत करून अपराध करीत आहेत. दिशाभूल करून अमिषाद्वारे ऑनलाईन फसवणुकीचे संकट वाढले असल्याची बाब रायगड पोलिसांच्या निदर्शनास आली. दुसऱ्याच्या नावावर बोगस बॅक खाते उघडणे, त्यातून आर्थिक अफरातफर करून फसवणूक करणे हा प्रकार रायगड पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा शोध घेतला. म्यूल बँक खातेधारकांनी आर्थिक लाभासाठी कमिशन घेऊन बँक खाती दुसऱ्याला वापरण्यास दिल्याचे निष्पन्न झाले. संघटित सायबर गुन्हेगारी टोळी चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करून 23 गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यात 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच श्रीवर्धन, अलिबाग, रोहा, नागोठणे, कर्जत, रसायनी, माणगाव, कर्जत, खोपोली, पोयनाड, पेण, कर्जत व कोलाड या 13 पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारीच्या दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या घटनांना आळा बसविण्यासाठी म्युल बँक खातेधारकांविरोधात पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली. सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.






