| मुंबई | प्रतिनिधी |
ठाणे येथे 1 डिसेंबरपासून होणाऱ्या 50व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता मुंबई शहर कबड्डी असो.ने आपले संघ जाहीर केले. साई चौगुले, कादंबरी पेडणेकर यांच्याकडे मुंबई शहरच्या पूर्व विभागाचे नेतृत्व सोपविण्यात आले, तर सनी कोळी, रिया मडकईकर यांच्या खांद्यावर मुंबई शहरच्या पश्चिम विभागाची नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. निवडण्यात आलेले हे संघ 1 डिसेंबर रोजी सकाळी स्पर्धेकरीता ठाण्याकडे रवाना होतील, अशी माहिती एका पत्रकाद्वारे सचिव विश्वास मोरे यांनी दिली.
कुमार संघ : साई चौगुले (संघनायक), विशाल लाड, निखिल कदम, सर्वदिप माने, सिद्धेश खांडेकर, आकाश साळवी, विवेक जाधव, अभिषेक बोंबले, प्रणील म्हात्रे, वेदांत सुतार, निकेश करकरे, राजू गुप्ता. प्रशिक्षक:- सुधीर वरखडे, व्यवस्थापक:- नितीन कदम.
कुमारी संघ : कादंबरी पेडणेकर (संघनायिका), लेखा शिंदे, अदिती काविलकर, वैष्णवी जाधव, तनिषा सिंग, सई शिंदे, मिताली गुरव, रुचिता पटेल, रिंपी सिंग, कृतिका चव्हाण, सौंदर्या दळवी, प्रिया दळवी. प्रशिक्षिका:- शुभांगी पाटील, व्यवस्थापक:- मधुकर पाटील.
मुंबई शहरचा कुमार संघ जाहीर
