वैभव, साईश्वर, सरस्वतीची विजयी घोडदौड
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असो.तर्फे 14 वर्षांखालील किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा माटुंगा (प) येथील ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर येथे सुरु आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराचे उमेश नरवणे, अॅड. अरुण देशमुख, बाळ तोरसकर, प्रफ्फुल्ल पाटील, चंद्रकांत तरळ, सुधाकर राऊळ, विकास पाटील, सुरेंद्र विश्वकर्मा, डलेश देसाई आणि नितीन पाष्टे हे मान्यवर उपस्थित होते.
किशोरींच्या ओम साईश्वर सेवा मंडळने सरस्वती कन्या संघाचा 9-2 असा 1 डाव 7 गुणांनी पराभव केला आहे. दुसर्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने आर्य सेनेचा 9-4 असा 1 डाव 5 गुणांनी पराभव केला आहे. तिसर्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने वैभव स्पोर्ट्स क्लबचा 17-5 असा 1 डाव 12 गुणांनी पराभव केला आहे. तर, चौथ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने ॐ समर्थ व्यायाम मंदिराचा 9-2 असा 1 डाव 7 गुणांनी पराभव केला.
किशोर गटाच्या पहिल्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लबने सरस्वती मंदिर हायस्कूलचा 9-5 असा 4 गुणांनी पराभव केला आहे. दुसर्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने स्टुडंट स्पोर्ट्स क्लबचा 8-1 असा 1 डाव 7 गुणांनी पराभव केला आहे. तिसर्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराचा 10-8 असा 1 डाव 2 गुणांनी पराभव केला. चौथ्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा 21-5 असा 1 डाव 16 गुणांनी पराभव केला आहे. तर, पाचव्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लबने अमर हिंद मंडळाचा 8-7 असा चुरशीच्या सामन्यात 1 गुणाने पराभव केला आहे.
किशोर गटाच्या उपांत्य फेरीमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळ विरुद्ध वैभव स्पोर्ट्स क्लब व सरस्वती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध विद्यार्थी क्रीडा केंद्र असा सामना रंगणार आहे.