। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषद हद्दीतील नागरी समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. याविरोधात शहरातील नागरिकांनी सोमवारी (दि.16) बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मंगळवारी उपोषणाच्या दुसर्या दिवस नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा या अपोषणाला मिळत होता.
कर्जत नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपला आहे. मुख्याधिकारी वैभव गारवे प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध गेल्या चार महिन्यांपासून निवेदन, चर्चा करून तसेच नगरपरिषदेला योग्य ती मुदत देऊन सुद्धा नागरी समस्या सुटल्या नाहीत. मुख्याधिकारी निष्क्रिय अधिकारी असल्याचा ठपका ठेवत तसेच निष्क्रिय कर्जत नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध स्थानिक नागरिकांनी सोमवारपासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन पुकारले आहे. उपोषणाच्या दुसर्या दिवशी अॅड. कैलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा जाधव, सूर्यकांत भानूसगरे, सतीश मुसळे, विजय बेडेकर, दिलीप दाभोळकर, रामेश्वर राठी आणि मल्हारी माने हे उपोषणाला बसले आहेत.