• Login
Thursday, May 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Dry Fish: रायगडातून हजारो टन सुकटीची निर्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 28, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
Dry Fish: रायगडातून हजारो टन सुकटीची निर्यात
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यात मागणीत वाढ

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात सध्या सुका जवळा अर्थात सुकटीचा हंगाम जोरात सुरू असून, बाजारपेठांमध्ये सुकटीला मोठी मागणी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद राहणार असल्याने सुकी मासळी खरेदी करून साठवून ठेवण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. स्थानिक बाजारपेठेसह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच कर्नाटक आणि गोवा राज्यांत सुक्या जवळ्याला मोठी मागणी असून, आतापर्यंत सुमारे तीन हजार टन सुक्या जवळ्याची निर्यात झाल्याची माहिती समोर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळ्याला चांगला दर मिळाल्याने मच्छिमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने जूनपासून दोन महिन्यांसाठी मासेमारी बंद राहणार आहे. त्यामुळे मासळीप्रेमींना ताजी मासळी मिळणे कठीण होणार असून, पावसाळ्यापूर्वी सुकी मासळी खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. वाकटी, बोंबील यांसह सुका जवळा मोठ्या प्रमाणात विकत घेऊन त्याची साठवण केली जात आहे. मार्च महिन्यापासून सुका जवळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. जाळ्यात मोठ्या प्रमाणात जवळा सापडल्याने मच्छिमारांना यंदा चांगला फायदा झाला आहे. पकडलेला जवळा सुकवून, स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येत आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच राज्यातील विविध जिल्हे आणि बाहेरील राज्यांमध्येही जवळ्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली आहे.

गतवर्षी दहा किलो जवळ्यामागे 730 ते 800 रुपये दर मिळत होता. मात्र, यंदा दहा किलो जवळ्यासाठी दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष विजय गिदी यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरूड तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात जवळ्याची निर्यात झाली आहे.

यंदा रायगडसह कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर या जिल्ह्यांमध्ये तसेच कर्नाटक आणि गोवा राज्यात सुक्या जवळ्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार टन जवळा विविध बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला असून, त्यामुळे मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.

शेकडो हातांना रोजगार
ओला जवळा बोटीतून उतरवणे, तो सिमेंट काँक्रीटच्या खळ्यांमध्ये सुकण्यासाठी पसरवणे, त्यानंतर त्याची स्वच्छता करणे तसेच सुका झालेला जवळा भरून ठेवणे अशी विविध कामे गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. या कामांमुळे परिसरातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दररोज 500 ते 700 रुपये मजुरीवर हे काम दिले जात आहे. काही ठिकाणी दहा ते पंधरा तर काही ठिकाणी पाच ते सात महिला या प्रक्रियेत कार्यरत आहेत. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांच्या हंगामात शेकडो हातांना रोजगार मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेणाच्या खळ्यांची जागा सिमेंट काँक्रिटने घेतली
पूर्वी मार्च महिन्यात जवळा सुकवण्यासाठी शेण आणि माती वापरून पारंपरिक खळ्या तयार केल्या जात होत्या. जमीन सपाट करणे, शेण-माती आणणे आणि खळी तयार करण्यासाठी मोठा खर्च करावा लागत होता. मात्र, हा खर्च टाळण्यासाठी आता सिमेंट काँक्रीटच्या खळ्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे पारंपरिक शेणाच्या खळ्या आता कालबाह्य होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मच्छिमारांना आर्थिक मदत करा
जून महिन्यापासून दोन महिन्यांसाठी मासेमारीवर बंदी लागू होणार आहे. या कालावधीत हजारो मासेमारी बोटी किनाऱ्यावरच उभ्या राहतील. त्यामुळे मच्छिमारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. रोजगाराचे साधन बंद राहिल्याने आर्थिक अडचणी निर्माण होणार असल्याने सरकारने प्रत्येक मच्छिमार कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी 10 ते 20 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष विजय गिदी यांनी केली आहे.

यंदा मोठ्या प्रमाणात जवळा जाळ्यात सापडला. गतवर्षीपेक्षा यंदा जवळ्याला चांगला दर मिळाला आहे. काही ठिकाणी सुका जवळा 100 ते 200 रुपये किलो दराने विकला गेला. रायगडसह कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच कर्नाटक आणि गोवा राज्यात सुमारे तीन हजार टन जवळ्याची निर्यात झाली आहे.

विजय गिदी,
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, मुंबई

Related

Tags: alibag newsDemand for Dried Fishfishing manindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssukat fish
Previous Post

जनगणनेच्या कामात चार शिक्षकांचा मृत्यू

Next Post

RCF School: शाळा ‌‘अनधिकृत’चा दावा खोटा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

जनगणनेच्या कामात चार शिक्षकांचा मृत्यू

May 28, 2026
रायगड

पालीत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

May 28, 2026
ऐतिहासिक विहिरीवर भरावाचे संकट
खालापूर

ऐतिहासिक विहिरीवर भरावाचे संकट

May 28, 2026
धोदाणीत सरपंच उतरले गटारात
पनवेल

धोदाणीत सरपंच उतरले गटारात

May 28, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये कचरा संकलनाचा बोजवारा

May 28, 2026
sliderhome

Murder Case: अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरण; 24 तासांत आरोपीला बेड्या

May 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?