कोर्ट कमिशनकडून मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौरा सुरू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत अलिबागमधील सामाजिक कार्यकर्ते आणि वकील अ‍ॅड.अजय उपाध्ये यांनी अलिबाग न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले होते. यासाठी तज्ञ अभियंता पी एन पाडळीकर यांची कोर्ट कमिशन म्हणून नियुक्ती न्यायालयाने केली आहे.

त्यानुसार आज 1 फेब्रुवारी पासून मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते माणगाव या मार्गाचा पाहणी दौरा कोर्ट कमिशन, याचिककर्ता आणि प्रशासन अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरू आहे. उद्या 2 फेब्रुवारी रोजी माणगाव ते पोलादपूर पर्यत पाहणी केली जाणार आहे. पळस्पे येथून पाहणी दौरा सुरू झाला असून महामार्गावर साईड पट्टी, साइन बोर्डचा अभाव आहे.

त्याचबरोबर स्पीडब्रेकरमुळे वाहने जम्प करीत असल्याचे दिसून आले आहे. तसेच योग्य पद्धतीच्या ठिकाणची माहितीही देण्यात आलेली नाही. असे प्रथम दर्शनी दिसण्यात आले आहे. सध्या कर्नाळा खिंडीत पाहणी सुरू आहे. दिवसभरात माणगाव पर्यत पाहणी ही कोर्ट कमिशन मार्फ़त केली जाणार आहे. दोन दिवस हा पाहणी दौरा असून त्यानंतर एक महिन्यात अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.

Exit mobile version