। पेण । प्रतिनिधी ।
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. बाळगंगा नदिला मोठा पुर आला असून जितेपासून गोविर्लेपर्यंतचा दोन ते तीन किलोमिटरचा रस्ता पूर्णताः पाण्याखाली गेला आहे. तर काही रस्ते खचले आहेत. अशातच अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्ग देखील पाण्याखाली गेला असून सध्या धिम्यागतीने वाहतूक सुरु आहे. मात्र पावसाने विश्रांती न घेतल्यास हा मार्ग देखील बंद होऊ शकतो, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. तसेच विनाकारण रस्त्यावर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.