| सुकेळी | वार्ताहर |
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गाची होणारी दयनीय अवस्था ही परंपरा यावर्षीच्या पावसात देखिल कायम राहीली आहे. त्यामुळे या महामार्गाबद्दल पुन्हा एकदा नाराजीचे सूर उमटत आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचे काम हे अद्यापपर्यंत पुर्ण झाले नाही. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे, त्या ठिकाणच्या रस्त्यावरील निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे तलावाचे स्वरुप आले आहे. कानसई गावानजिक रस्त्यावर पुर्णतः पाणीच पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवतांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल वाहनचालक व नागरीकांमधुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाला तलावाचे रुप
