मुंबई इंडियन्सला मिळाला नवीन कोच

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई इंडियन्स महिला संघाला नवा कोच मिळाला.ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू लिसा नाइटली यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.चार्लोट एडवर्ड्स यांची जागा लिसा नाइटली यांनी घेतली.महिला प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्यांच्या नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियन लिसा नाइटली यांची कोच म्हणून निवड करण्यात आली आहे. चार्लोट एडवर्ड्स ह्या आधी मुंबई संघाच्या प्रशिक्षक होत्या. लिसाने ऑस्ट्रेलियन महिला संघाला दोन एकदिवसीय विश्वचषक विजेतेपदे (1997 आणि 2005) मिळवून दिली आहेत. ती महिला क्रिकेटमधील सर्वात आदरणीय प्रशिक्षकांपैकी एक आहे. त्या भरपूर अनुभवी आहेत जे मुंबई संघासाठी उपयुक्त ठरेल. प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर लिसा नाइटलीने म्हणाले, वूमेन्स प्रीमियर लीगमध्ये नवीन मानके प्रस्थापित करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासोबत जुडणं हे सन्मानजनक आहे. यशावर भर देण्यात येईल, मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रेरणा देताना या प्रतिभावान टीमसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. लिसा नाइटली ही इंग्लंडची मुख्य प्रशिक्षक बनणारी पहिली महिला होती.

तिने ऑस्ट्रेलियन महिला संघासाठी 9 कसोटी, 82 एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. वूमेन्स प्रीमियर लीगच्या मालकीण नीता अंबानी म्हणाल्या, मुंबई इंडियन्स कुटुंबात लिसा नाईटलीचे स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय. लिसाने महिला क्रिकेटबद्दलच्या तिच्या आवडीने पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. तिच्या आगमनाने मुंबई इंडियन्ससाठी एका रोमांचक नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे.

Exit mobile version