| माथेरान | वार्ताहर |
महिला प्रीमियर लीग 2023 आयपीएलचे बिगुल वाजले असून येत्या 4 मार्चपासून या स्पर्धेता सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत माथेरानमधील हुमेरा काझी हिची निवड झाली आहे. ती मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.

महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव झाला आहे. यामध्य माथेरान मधील हॉटेल व्यवसायिक साहेबान हॉटेलचे मालक जमीर काझी यांची कन्या हुमेरा काझीची निवड झाली आहे. महिला प्रिमिअर लीग 2023 स्पर्धेमध्ये मुंबई इंडीयन संघाचे प्रतिनिधीत्व ती करणार असल्याने माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
2011 मध्ये इलेव्हन स्टार क्रिकेट संघाच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धे दरम्यान गुणगौरव व पारितोषिक सोहळ्यात माथेरानच्या राम चौकात हुमेरा काझी हीचा माथेरानकर व इलेव्हन स्टार क्रिकेट संघाकडुन कौतुक सोहळा पार पडला होता. हुमेरा काझी त्यावेळी 16 वर्षे वयोगटात महिला क्रिकेट संघात खेळत होती. आज पर्यंतच्या कामगिरीत तिने अष्टपैलु खेळांडुंमध्ये (ऑल राऊंडर) म्हणून संघामध्ये आपले स्थान प्रस्थापित केले आहे. आता तिची निवड महीला आयपीएलसाठी मुंबई इंडीयन संघात झाल्याने हुमेरावर सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.