| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आवास, ता.अलिबाग येथील समुद्रकिनारी सीआरझेड बाधित क्षेत्रात करण्यात आलेले बांधकाम तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आवास ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत माहिती देताना ग्रामस्थ मच्छिंद्र पांडुरंग कवळे यांनी सांगितले की, आवास येथील समुद्रकिनार्यावरील सी.आर.झेड. बाधित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामा बाबत रेमु झवेरी व नीता तन्ना यांचे दावे अलिबाग येथील दिवाणी न्यायालयाने फेटाळले आहेत. तसे आदेशही दिवाणी न्यायाधीस विक्रम मधूकर कर्हाडकर यांनी यापूर्वीच दिले असल्याचे आवासचे ग्रामस्थ मच्छिंद्र पांडुरंग कवळे, विजय बाळकृष्ण राणे, विजय छगन राणे, केशव वामन घरत, सुधाकर बाळकृष्ण राणे यांनी म्हटले आहे.
दिवाणी न्यायालयाच्या या आदेशाला कोणताही स्थगिती आदेश नसल्याने प्रशासनाने उच्च न्यायालयातील पी.आय.एल. 107/2009 च्या निर्देशानुसार सदर अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी ही या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढून सदर रस्ता मोकळा करून मिळावा, असेही सुचित करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या या मागणीबाबत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.