| हैदराबाद | वृत्तसंस्था |
आयपीएल 2025 मधील 41 वा सामना अतिशय रोचक ठरला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले. नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे यशस्वी ठरला. सुरुवातीपासूनच मुंबईने हैदराबादवर वचक ठेवला. मुंबईच्या गोलंदाजांनंतर फलंदाजांनी कमाल कामगिरी केली. मुंबई इंडियन्सनी हा सामना सात गडी आणि 26 चेंडू राखत जिंकला.
अवघ्या 13 धावांवर मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या 4 प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवले. नवव्या ओव्हर अखेर हैदराबादची अवस्था 35 धावांत 5 बळी अशी होती. हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर यांनी जबाबदारीने फलंदाजी करत 101 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाला सावरले. त्यांच्या खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने 143 धावा केल्या.
144 धावा करताना रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा सलामीसाठी मैदानात उतरले. 11 धावा करुन रिकल्टन माघारी परतला. त्यानंतर रोहितने विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत भागीदारी केली. विल जॅक्सने 22 धावा केल्या. 70 धावांवर रोहित शर्मा कॅचआउट झाला. सूर्यकुमार यादवने नाबाद 40 धावा केल्या. विजयाचा चौकार देखील सूर्याने मारला. सलग 4 सामने जिंकल्यानंतर मुंबईचा नेटरनरेट वाढला आहे. पॉईंट्स टेबलवर मुंबईने तिसऱ्या क्रमावर झेप घेतली आहे.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 -
रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथूर.
सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग 11 -
अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनदकट, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.