राष्ट्रीय दिव्यांग पॅरा कब्बडी स्पर्धेत महाराष्ट्र-मुंबई कबड्डी संघ उपांत्य फेरीत

। तळा । वार्ताहर ।
पुष्कर, राज्यस्थान येथे चालू असणार्‍या राष्ट्रीय दिव्यांग पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र व मुंबई पॅरा कबड्डी संघाने चांगली कामगिरी करत आपले स्थान प्रस्थापित करून उपांत्य फेरीत सहभागी झाले आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जनार्दन सिंह गहलोत याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय पॅराकबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने अ गटात झारखंड बिहार, मुंबई व उत्तर प्रदेश या संघाना हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला तर मुंबई संघाने झारखंड, बिहार व उत्तर प्रदेश या संघाना हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र संघाकडून रायगड जिल्ह्यातील राजेश मोकल, अक्षय निकम, ओमकार महाडिक व कर्णधार रमेश संकपाळ, मुकुल खाडे नंदुरबार जिल्ह्यातील महेश वसावे, सांगली जिल्ह्यातील आरिफ शेख आणि मुंबई संघाकडून नंदुरबार जिल्ह्यातील रायसिंग वसावे, सांगली जिल्ह्यातील ज्योतिराम कदम रायगड जिल्ह्यातील कर्णधार मंगेश म्हात्रे, गणेश पाटील यांनी चांगली कामगिरी केली असे कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र व सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रोहा रायगडचे सचिव व दोन्ही संघाचे व्यवस्थापक शिवाजी पाटील व सहव्यवस्थापक संकल्प अपंग संस्थेचे सचिव बाबाराव धोत्रे यांनी माहिती दिली.B

Exit mobile version