मुंबई मनपा OBC आरक्षण सोडत, दिग्गजांचे वॉर्ड बदलले!

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा ओबीसी आरक्षण (OBC reservation) सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज ही प्रक्रिया पार पडत आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर आता एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता, यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करुन, नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढण्यात आले.

आज एससी, एसटी प्रवर्गाचे यापूर्वी घोषित झालेले आरक्षण वगळता 236 पैकी 219 प्रभागांची आरक्षण लॉटरी काढण्यात आली. 219 पैकी 63 प्रभाग हे ओबीसी आरक्षित झाले आहेत. 63 पैकी 53 प्रभागात गेल्या तीन निवडणुकांमधे एकदाही ओबीसी आरक्षण आलेले नसल्याने नियमानुसार 53 वॉर्ड ओबीसी आरक्षितच होतील. कोणते 53 वॉर्ड ओबीसींसाठी आरक्षित (BMC OBC Ward) आहेत? (या वॉर्डांमध्ये मागील तीन निवडणुकांत ओबीसी आरक्षण नव्हतं.

निश्चित वॉर्ड
3, 7, 9, 12, 13, 27, 30, 38, 40, 42, 48, 51, 53, 62, 76, 79, 81, 87, 89, 101, 110, 117, 128, 129, 132, 135, 137, 146, 147, 148, 150, 152, 154, 155, 159, 161, 164, 174, 179, 180, 183, 185, 188, 195, 200, 202, 203, 217, 218, 222, 223, 230, 236

ओबीसी आरक्षणासाठी अन्य 10 वॉर्डांसाठी लॉटरी काढण्यात आली
लॉटरी ड्रॉ वॉर्ड
17, 82, 96, 73, 16, 127, 98, 61, 173, 130

कोणते वॉर्ड OBC आरक्षित?
राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांचा वॉर्ड क्र 130 ओबीसी आरक्षित. आधी हा वॉर्ड ओपन होता. राखी जाधवांना बाजूचे वॉर्ड धुंडाळावे लागणार

Exit mobile version