मुंबई मनपाचे आता 236 वॉर्ड होणार

मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई महापालिकेतील वॉर्डच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या 227 वरुन ही वॉर्ड्सची संख्या आता 236 करण्यात आली आहे. म्हणजेच वॉर्ड्सच्या संख्येत 9 ने वाढ करण्यात आली आहे. याबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यानंतर या वॉर्डच्या रचनेवर काम सुरु होईल, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असून यानंतरच यावर काम सुरु होईल. तसेच महापालिका निवडणुकीआधी हे काम पूर्ण होईल. दरम्यान, कोणत्या विभागात किती वॉर्ड वाढवायचे याचे नियोजन महापालिका करणार आहे. याचा प्रस्ताव लवकरच महापालिका तयार करणार आहे.

Exit mobile version