महानगरपालिकेचे आवाहन
। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
कोल्हापूर शहरात येत्या रविवारी आणि सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. यामुळे पिण्याचे पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने करण्यात आले आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय महापालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
शहरातील शिंगणापूर बंधार्याला मोठी गळती लागली आहे. रविवार (24) आणि सोमवार (25) या दोन दिवशी गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शिंगणापूर उपसा केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान शहरातील ए, बी, सी, डी व ई वॉर्ड आणि त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागाचा समावेश आहे. या भागांत पाणी पुरवठा बंद असणार आहे. 26 ऑक्टोबरला पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. सर्वच वॉर्डातील नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी टँकरद्वारे पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले.