| मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत खेळविण्यात येत असलेल्या आयआयएफएल वेल्थ मुंबई ओपन बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरी अखेर 8 नामवंत बुद्धिबळपटूंनी 4 विजयांसह 4 गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे. मुंबई ओपन बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या दिवशी अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी, रित्विक कृष्णन, संजीव मिश्रा, आदिरेड्डी अर्जुन, सिद्धार्थ अल्वारेस, श्रयन मजुमदार आणि अरविंद अय्यर यांनी आपल्या सर्व लढती जिंकत पूर्ण 4 गुणांची कमाई केली आहे. अंश नेरूरकर आणि रघु राम रेड्डी यांनी 3.5 गुणांसह संयुक्त दुसरे तर एकूण 29 बुद्धिबळपटूंनी 3 गुणांसह संयुक्त तिसरे स्थान मिळवले आहे. अग्रमानांकित विक्रमादित्यने टॉप पटावर खेळताना राजवीर नायरचा 36 चालीत पराभव केला. पांढर्या मोहर्या घेऊन खेळताना विक्रमादित्यने किंग इंडियन डिफेन्स पद्धतीने आपला सोपा विजय साकारला. दुसर्या पटावर रित्विक कृष्णनने देवांश शाहवर अवघ्या 27 चालींत विजय मिळवला. तिसर्या पटावर श्रयन मजुमदाराने ॠतुराजला 56 चालींत पराभूत करीत पूर्ण 1 गुण मिळवला.