चालक जखमी, बसचे नुकसान
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
दापोली तालुक्यामधील पालगड या ठिकाणी मंडणगडवरून दापोलीकडे येणार्या एस टी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने खळबळ उडाली असून यात चालक जखमी झाला असून बसचे सुद्धा नुकसान झाले आहे.
दापोली पोलिस स्थानकात याबाबत तक्रार नोंदवण्यात अली आहे. त्या नुसार एस टी चालक अनंत दयाळकर, (50) हे दापोली आगारामधील आपल्या ताब्यातील बस (एम . एच . 14 बी टी 1371) घेऊन रविवारी, 2 जानेवारी रोजी मंडणगड वरून दापोलीकडे येत होते. संध्याकाळी 7.15 च्या सुमारास ते पालगड या ठिकाणी बस घेऊन आले.
त्यावेळी पालगड जोशी बंगल्याच्या पुढे अज्ञात मोटरसायकलस्वार यांनी चालत्या बसवर अंधारातून दगड भिरकावले. तेव्हा बसच्या समोरील काचेवर दगड लागून काच फुटली तो दगड चालक अनंत दयाळकर यांच्या उजव्या पायाला लागून त्यांना दुखापत झाली. या घटनेमध्ये बस चे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दापोली पोलिस स्थानकात अज्ञाता विरुद्ध भा.दं. वि. कलम 427, 337 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस फौजदार मिलिंद चव्हाण करीत आहेत.