बनावट औषधे बनविणार्‍या टोळीचा छडा


मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबई | प्रतिनिधी
|
महाराष्ट्रासह देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर दिला जात आहे. दुसरीकडे करोनाच्या आडून पैसे कमावण्यासाठी जीवघेणे कामं होताना दिसत आहे. असाच एक भयंकर प्रकार मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशात कारवाई करत करोनावर बोगस औषधी बनवणार्‍या कंपनीच्या मालकाला बेड्या ठोकल्या.

गेल्या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 मे रोजी महाराष्ट्र अन्न आणि औषधी प्रशासन अर्थात एफडीएने केरोनावर बोगस औषधी तयार केली जात असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. हिमाचल प्रदेशातील सोलन येथील मॅक्स रिलीफ हेल्थकेअर बोगस गोळ्यांचं उत्पादन करत असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. मुंबईतील तीन औषधी वितरकांवर (ड्रग्ज डिलर) छापे टाकल्यानंतर ही माहिती हाती आली होती.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. मॅक्स रिलीफ हेल्थकेअर अशी औषध निर्माता कंपनी अस्तित्वात नसल्याचं तपासातून समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी मालक सुदीप मुखर्जी याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास करत असताना मिश्रा नावाची व्यक्ती एका खासगी प्रयोगशाळेत बोगस गोळ्या बनवत असल्याचं समोर आलं. मिश्रा करोनावरील औषधी तयार करून मुखर्जीकडे पाठवायचा. मुखर्जी ही औषधी इतरांना विकायचा, अशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांनी दिली.

Exit mobile version