‘या’ मार्गावरील वाहतूक तीन दिवस बंद

। पुणे । प्रतिनिधी ।

यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर तुळई बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी, बुधवारपासून ते 24 जानेवारीपर्यंत दुपारी 12 ते 3 या वेळेत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार असून ती इतर मार्गांवर वळवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील किमी क्र. 58/500 (डोंगरगाव/कुसगाव) येथे पूल बांधण्यात येत आहे. त्या पुलाची तुळई बसविण्यात येणार आहे. हे काम 22 ते 24 जानेवारीदरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेत केले जाणार आहे. त्यासाठी तीन तासांचा वाहतूक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे. तीन तासांच्या वाहतूक ब्लॉकदरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक महामार्गाच्या पुणे वाहिनीवरील किमी क्र. 54/700 वळवण ते वरसोली टोलनाका येथून देहूरोडमार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

Exit mobile version