मुंबई विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धा

मृणाल सरोदे यास सुवर्ण पदक

। उरण । वार्ताहर ।

वीर वाजेकर ए.एस.सी.कॉलेज फुंडे, उरणच्या मृणाल सरोदे याने कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा येथे मुंबई विद्यापीठ आयोजित क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी.जे.पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील, सुधीर घरत, भावना घाणेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.जी. पवार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले त्यांना जिमखाना प्रमुख डॉ. विलास महाले, देवेंद्र कांबळे यांचे मागर्दर्शन लाभले.

Exit mobile version