रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकराचा जलवा

सरफराज खानचे पुन्हा एकदा द्विशतक; भारतीय संघात पुन्हा ठोठावला दरवाजा

| हैदराबाद | वृत्तसंस्था |

रणजी ट्रॉफीचे सामने आता सुरु झाले आहेत. विजय हजारे ट्रॉफी नुकतीच संपली. या स्पर्धेत विदर्भाने बाजी मारली. विदर्भाने पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकली. आता सगळे संघ पुन्हा एकदा रणजी जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. देशांतर्गत स्पर्धेत काही खेळाडू सतत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. तरीही भारतीय संघात खेळाडू स्थान मिळवू शकत नाहीये. आता मुंबईच्या स्टार खेळाडूने सरफराज खानने सामन्यात पुन्हा एकदा शतक नाहीतर द्विशतक ठोकले आहे.

भारतीय संघाचा फलंदाज सरफराज खान सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर, रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याचा सुवर्ण फॉर्म कायम आहे. रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने शानदार द्विशतक झळकावले. सरफराजने हे द्विशतक 202 चेंडूत पूर्ण केले. या सामन्यात त्याला त्रिशतक पूर्ण करण्याची संधी होती, परंतु तो ते करू शकला नाही. या खेळीसह त्याने भारतीय संघामध्ये पुनरागमनाचा दरवाजा ठोठावला आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात त्याने 206 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. 219 चेंडूत 9 षटकार आणि 19 चौकारांच्या मदतीने 227 धावा करून तो अखेर बाद झाला. हे त्याचे 17 वे शतक आणि त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सहावे द्विशतक होते. सरफराजने 50 दिवसांत तिन्ही देशांतर्गत स्वरूपात शतके झळकावली आहेत. 2 डिसेंबर रोजी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध फक्त 47 चेंडूत 100 धावा केल्या. 31 डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोवाविरुद्ध 75 चेंडूत 157 धावा करून तो बाद झाला. आता, त्याने रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावले आहे.

पाच धावांचा टप्पा पार
सर्फराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5,000 धावांचा टप्पाही ओलांडला. आतापर्यंत, त्याने या फॉरमॅटमध्ये 64.3 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 70.10 आहे. त्याने आता 61 सामन्यांमध्ये 91 डावात 49 पेक्षा जास्त सरासरीने 5090 धावा केल्या आहेत. आता, टीम इंडिया खेळत असलेल्या पुढील कसोटी मालिकेत सर्फराज खानला संधी मिळते याकडे लक्ष असेल.
Exit mobile version