। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी करणार्या भारताच्या स्टार खेळाडूंना बीसीसीआयकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत अनेक अनुभवी खेळाडू आपापल्या संघांसाठी रणजी सामना खेळत आहेत. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील रणजी ट्रॉफीमध्ये आपली प्रतिभा दाखविण्यास सज्ज आहे. 2012 मध्ये शेवटचा रणजी ट्रॉफी खेळलेला विराट बर्याच काळानंतर दिल्लीकडून या प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन करणार आहे. दिल्लीचा संघ 30 जानेवारीपासून अरुण जेटली स्टेडियमवर रेल्वेविरुद्ध शेवटचा गट सामना खेळणार आहे. तसेच, सोमवारी (दि.27) रेल्वेविरुद्ध होणार्या सामन्यासाठी आयुष बदोनीच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघात कोहलीची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे.