। म्हसळा । वार्ताहर ।
शासकीय व निमशासकीय अधिकारी तथा कर्मचारी वर्ग दिवसभर कामांमध्ये व्यस्त असतात त्यामुळे त्यांच्यावर ताण येतो. या ताण तणावातून मुक्तता व उसंत मिळावी तसेच आरोग्य सुदृढ राहावे, या उदात्त हेतूने म्हसळा तहसीलदार सचिन खाडे यांच्यावतीने भव्य दिवस रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मुसद्दीक इमानदार यांचा पटांगणात करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेत तहसील कर्मचारी, महावितरण कर्मचारी, शिक्षक कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी, व्यापारी संघटना, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, नगरपंचायत कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत म्हसळा पोलीस स्टेशनच्या संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात महावितरण कर्मचार्यांचा पराभव करून चषक आपल्याकडे राखला आहे.