। वसई । प्रतिनिधी ।
वसईच्या कोपर गावातील सागर वझे (27) हा तरुण गावात क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, सागर हा चांगला क्रिकेट खेळत असल्याने त्यांनी मृत्यूपूर्वी सलग दोन चेंडूवर दोन षटकार मारले आणि तिसरा षटकार मारत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच कोसळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.24) संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. सागरला या अगोदर हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा डॉक्टरने त्याला क्रिकेट खेळाण्यास मनाई केली होती. मात्र, क्रिकेटची आवड असल्याने तो शुक्रवारी आपल्या गावातील क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले.