मुंबईचे डबेवाले चालले सुट्टीवर; काय आहे कारण?

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईचे डबेवाले बुधवार, दि. 9 एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. 9 ते 14 एप्रिलपर्यंत डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. 15 एप्रिलपासून ते पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.

मुंबईमध्ये कार्यालयात डब्बा पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांतील आपल्या गावी दरवर्षी जातात. ग्रामदैवत/कुलदैवतांच्या यात्रांत सहभागी होतात. यंदाही ते सहा दिवस या सुटीवर आहेत. त्यात महावीर जयंती, हनुमान जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती यासाठी सुट्टीवर जाणार आहेत. ग्राहकांनी या सुटीच्या कालावधीतील डबेवाल्यांचा पगार कापू नये, अशी विनंतीही तळेकर यांनी केली आहे.

Exit mobile version