मुंबईची कोमल महाराष्ट्राची कर्णधार

। मुंबई । प्रतिनिधी ।
दादरी-हरियाणा येथे दि. 10 ते 13 मार्च या कालावधीत होणार्‍या 68व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपला संघ जाहीर केला. मुंबई उपनगरच्या कोमल देवकरच्या खांद्यावर महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे.
परभणी येथे डिसेंबर 2021 रोजी झालेल्या 68व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला आहे. या निवडण्यात आलेल्या संघात पुण्याने बाजी मारली असून पुण्याचे 5 खेळाडू या संघात आहेत. महिला संघ :- कोमल देवकर (संघनायिका)- मुंबई उपनगर, स्नेहल शिंदे, सायली केरीपाळे, पूजा शेलार, अंकिता जगताप (चारही पुणे), पूजा पाटील-पालघर, पूजा यादव-मुंबई शहर, सायली जाधव-मुंबई उपनगर, मेघा कदम-मुंबई शहर, तेजस्वी पाटेकर- मुंबई उपनगर, मानसी रोडे-पुणे, निकिता लंगोटे-परभणी. प्रशिक्षक – संजय मोकल-रायगड, व्यस्थापिका : सुजाता काळगांवकर.

Exit mobile version