सागरी मार्गाने मुंबईची वाहतूक समस्या मिटणार

| मुंबई | प्रतिनिधी |
दक्षिण मुंबईतील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी येत्या मरीन ड्राईव्ह ते वरळी सागरी किनारा मार्ग पूर्ण करण्याचे आमच्या पथकाचे प्रयत्न राहतील, असा विश्‍वास मुंबई महानगरपालिकेच्या सागरी किनारामार्ग विभागाचे मुख्य अभियंता मंत्तय्या स्वामी यांनी मुंबईकरांना दिला आहे . मुंबई महानगरपालिकेतर्फे पत्रकारांना सागरी किनारा मार्ग पाहणी दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी तेथील अभियंत्यांनी सविस्तर माहिती दिली. 12 हजार कोटी रुपयांच्या सागरी किनार्‍याची मुहूर्तमेढ 2014 साली शिवसेना – भाजप सरकारच्या काळात रोवण्यात आली होती.मात्र प्रत्यक्षात ऑक्टोबर 2018 साली कामाला सुरुवात झाली.त्यात कोरोनामुळे 2 वर्ष वाया गेली.मात्र आता नोव्हेंबर 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, अस यावेळी स्वामी यांनी पत्रकारांना सांगितले.

प्रसिद्ध एल अ‍ॅण्ड टी आणि कन्स्ट्रक्शन कंपनी या सागरी किनारा प्रकल्पाचे काम करीत आहेत. कॉन्क्रीटचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.पहिल्या टप्यात 11 मीटर व्यासाचे 2 बोगदे तर एक आच्छादित बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. या बोगद्यात अग्निशमन यंत्रणा असून त्याकरीता सुमारे 4 लाख लीटर पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे .एकूण 111 हेक्टर क्षेत्रावर टाकण्यात आला. त्यापैकी 70 हेक्टर क्षेत्राचे हरित क्षेत्र करण्यात आले आहे. बोगद्यांमध्ये हवा खेळती राहावी म्हणून युके मधील सकार्डो वायव्हीजन प्रणाली योजना राबविण्यात आली आहे.11 मीटर व्यासाचे बोगदे खोदण्यासाठी चीनवरून अवाढव्य असा मावळा यंत्र एल एन्ड टी कंपनीने मागवले होते.या सागरी मार्गावर 16 सबवे 2 पोलीस चौक्या बांधण्यात आल्या तट संरक्षक भिंत बांधण्यात आली असून यामुळे किनार्‍याची धूप होण्यापासून तसेच वादळी वारा,लाटा आणि पुरापासून संरक्षण होईल.प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आणि प्रसिद्ध हाजीअली बाबा दर्गा जवळील भागही संरक्षित होईल .पुढील 100 वर्षाचा विचार करून याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे,अशी माहिती स्वामी यांनी दिली.

इंधन आणि वेळेची बचत
सागरी रस्ता 8 पदरी तयार होणार आहे.मुंबईकरांची 70 टक्के वेळेचे बचत होणार असून 34 टक्के इंधनाची बचत होईल.तसेच वाहनांमुळे होणारा ध्वनि प्रदूषण व वायु प्रदुषण कमी होईल.हिरवीगार उद्याने,सायकल ट्रॅक,जॉगिंग ट्रॅक, वरळी येथे सार्वजनिक पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आह.सागरी किनारा मार्गावर नाविन्यपूर्ण प्रकाशयोजना करण्यात येणार असल्यामुळे या परिसराला एक वेगळी झळाळी सागरी मार्गाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल या करिता आमची पूर्ण टीम अहोरात्र काम करित असा .अस मुख्य अभियंता मंत्तय्या स्वामी यांनी पत्रकारांना सांगितले .

Exit mobile version