कराटे स्पर्धेत मुमुक्षाला सुवर्णपदक

। मुरुड । वार्ताहर ।
काठमांडू नेपाळ येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पहिली इंडो नेपाळ इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2022 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील चौल सागमळा येथील दहावीची विद्यार्थिनी मुमुक्षा आनंद घरत हिने काता विभागात सुवर्णपदक व कुमिते विभागात रौप्यपदक मिळविले. मुमुक्षाला नेपाळ येथे मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेत भारतातून व नेपाळमधून सुमारे 50 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत काता विभाग व कुमिते विभागात घेण्यात आलेल्या स्पर्धेत मुमुक्षाने चांगली कामगिरी केली आहे. याप्रसंगी प्रमुख प्रशिक्षक शिहान राहुल तावडे, प्रमुख संघटक शिहान राजेंद्र ओझा, आयोजक डॉ. दीपक कटारिया इत्यादी उपस्थित होते. मुमुक्षाने नेपाळमध्ये केलेल्या अभिमानास्पद कामगिरीमुळे जिल्ह्यातील सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version