| घनसावंगी | प्रतिनिधी |
घनसावंगी तालुक्यातील शेवता गावातील शेतीच्या अंतर्गत वादातून 6 जणांनी लाठ्या व काठ्यांनी मारहाण करून एकाला जीवे मारले आहे. ही घटना शनिवारी (दि.22) रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी रविवारी (दि.23) पहाटे साडेचार वाजता सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण अश्रुबा कांबळे (57) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मळािलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण कांबळे आणि राहुल सोनावणे हे एकाच गावात राहत असून त्यांचे समोरासमोर घरं आहेत. दरम्यान, मागील भांडणाच्या कारणावरून मनात राग धरुन राहुल सोनवणे याने लक्ष्मण कांबळे यांना धमकी दिली. त्यानंतर विकास सोनवणे यांनी लक्ष्मण कांबळे यांच्या घरासमोर गैरकायद्याची मंडळी जमवुन हातात काठ्या घेऊन कांबळे यांच्या डोक्यावर काठीने मारुन गंभीर दुखापत केली. त्यांनतर पुन्हा सखाराम सोनवणे याने काठीने कांबळे यांच्या डोक्यात मुक्कामार दिला. त्यात ते गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले. त्यानंतर कमलबाई सोनवणे, अनिता सोनवणे व कल्पना सोनवणे यांनी कांबळे यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी शंशिकांत कांबळे (35) यांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात राहुल सोनवणे, विकास सोनवणे, सखाराम सोनवणे, कमलबाई सोनवणे, अनिता सोनवणे, कल्पना सोनवणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
शेतीच्या अंतर्गत वादातून हत्या
