| वेनगाव | प्रतिनिधी |
धम्म मार्गात आलेल्या नागरिकांना स्वतः प्राप्त केलेले ज्ञान देऊन त्यांचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न बुद्धाने केला, गौतम बुद्धांनी उपाय कौशल्याचा प्रशस्त परिपूर्ण व अपुनरावृत मार्ग अनुसरून तब्बल 45 वर्षे भटकंतीतून समाज प्रबोधनाचे कार्य केले, स्त्री व पुरुष असा भेदभाव न करणारे गौतम बुद्ध स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्रीमूल्यांचा मूलभूत पाया रचणारे पहिले क्रांतिकारक युगपुरुष होते, असे उद्गार उषा कांबळे यांनी कर्जतमध्ये वर्षावास मालिकेच्या सांगता समारोप प्रसंगी काढले.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने रविवार, दि. 19 ऑक्टोबर रोजी कर्जत अमराई बुद्धविहार येथे वर्षावास प्रवचन मालिकेचा समारोपाचा कार्यक्रम उत्साहत पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी भूषवले. यावेळी ॲड. कैलास मोरे, अनंत गायकवाड, ज्योती क्षीरसागर, छाया गवई, वैशाली बोखरे, नंदा कांबळे, संतोष जाधव, प्रकाश सोनवणे, राजेंद्र बावस्कर, सुनील गायकवाड, प्रदीप ढोले, मुकुंद सोनवणे, जनार्दन कांबळे, संजय शिंदे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील ग्रहण करून झाली.
या दरम्यान कर्जत तालुक्यातील किरवली येथील प्रतीक प्रकाश गायकवाड हा विद्यार्थी आपल्या पुढील शिक्षणासाठी रशिया येथे जाणार असून, तसेच गुंडगे गावातील सुमेध दिगंबर पवार हा युरोप येथे शिक्षणासाठी जात असल्याने यावेळी या दोन्ही मुलांचा कार्यक्रमातील सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत देसाई व संतोष सोनवणे यांनी केले. यावेळी उल्हास जाधव, श्याम जाधव, सचिन सरोते, योगेश गायकवाड, किशोर कामत, हिराताई हिरे, प्राजक्ता देसाई, तेजस्विनी जाधव, सारदा वाघमारे, कल्पना कांबळे, पूजा जाधव, दीपाली जाधव, विजय सोनवणे, रिया गोतरने, अशोक गायकवाड, मारुती भालेराव, राहुल गायकवाड, विकी जाधव, संदेश जाधव, सुनील जाधव, सचिन सरोते आदींसह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







