किरकोळ वादातून मित्राचा खून

। पुणे । वृत्तसंस्था ।
गमतीत झालेल्या भांडणातून एका मित्राने दुसर्‍या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मित्रानेच मित्रावर चाकुने सपासप वार करत त्याचा निर्घृण अंत केला. यानंतर त्या आरोपी मित्राने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिलीये. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मित्राला ताब्यात घेतलं आहे. अमन अशोक यादव (वय 26) असं खून झालेल्या मित्राचं नाव आहे. तर, चेतन पाटील असं खून करणार्‍या मित्राचं नाव आहे. पुण्यातील आसरीएम गुजराती शाळेसमोरील फुटपाथवर ही घटना घडली आहे.

Exit mobile version