झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन
| मुरुड | वार्ताहर |
मालमत्ता हडप करण्यासाठी पत्नीनेच पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत चंदन जैन यांच्या भगिनीने मुरुड पोलिसात तक्रार नोंदविली आहे. याबाबतचे वृत्त असे, मुरुडमधील व्यापारी चंदन जैन यांना आनुवंशिक स्नायूंच्या आजारी आहेत. काही महिन्यांपूर्वी ते खूप आजारी होते. त्यांना संडासचा त्रास सुरू होता यासाठी जैन यांच्या पत्नी पायल जैन यांनी आपला साथीदार मंजर महमद अली जुईकर याच्या सल्ल्यानुसार चंदन जैन यांना झोपेच्या गोळ्या देण्यास सुरुवात केली होती.झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन झाल्याने त्यातच चंदन जैन यांचा मृत्यू झाला.
हे सारे पायन जैन यांनी मालमत्ता मिळावी याच हेतूने केले असल्याचा आरोप चंदन जैन यांची बहीण पुष्पा प्रकाश गांधी यांनी केला. त्यासाठी प्रत्यक्ष काही पुरावे व मोबाईल कॉल रेकॉर्ड याचा आधार घेत करून मुरुड पोलिसांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती. याबाबतची फिर्याद गांधी यांनी नोंदवली होती. पुष्पा प्रकाश गांधी हिने मुरुड पोलीस ठाण्यात महिनाभर आधी तक्रार अर्ज दिला होता.
परंतु पोलीस पुरावे तपासण्याची कारणे सांगून गुन्हा दाखल करत नसल्याने पुष्पा हिने शिवसेना भवन गाठले व आपली कैफियत मंडळी ठाकरे सेनेच्या नेत्या सीमा राऊत यांनी सर्व बाजू समजून घेऊन तातडीने रायगड पोलीस अधीक्षकांना या बाबत विनंती केल्याने रायगड अधीक्षक यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिल्याने पत्नी पायल जैन व साथीदार मंजर महमद अली जुईकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. सदरील सर्व घटना व पुरावे तपासून अखेर मुरुड पोलिसांनी चंदन जैन यांची पत्नी पायल जैन व साथीदार मंजर महमद अली जुईकर यांच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास मुरुड पोलीस निरीक्षक राहुल अतिगरे करीत आहेत
स्वदेशी मुरगाव नौदलला सुपूर्द
मुंबई – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थित स्वदेशी बनावटीची मिसाइल डिस्ट्रॉयर मुरगाव रविवारी (18 डिसेंबर) भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आली. नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे हा कार्यक्रम पार पडला. यामुळे हिंदी महासागरात भारतीय नौदलाचा दरारा वाढणार असून देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. यावेळी उऊड जनरल अनिल चौहान, नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार, गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.